मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. 10 प्रभागातील 20 नगरसेवक/नगरसेविका पदासाठी जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीत प्रत्येक प्रभागातील एक जागा सर्वसाधारण महिलासाठी (एकूण 10 जागा) राखीव करण्यात आल्या. तर प्रभाग तीन मधील एक जागा अनुसूचित जातीसाठी पुरुष/महिला यापैकी कोणीही यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. उर्वरीत जागा या सर्वसाधारण अर्थात महिला/पुरुष कोणीही असणार आहेत.

प्रांताधिकारी वंदना खरमाळे, नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मामा वररेकर नाट्यगृह येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. लहान मुलगी वेदिक सुभाष कुमठेकर यांच्या हस्ते आरक्षण सोडत चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी माजी लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण नगरपरिषदेच्या मागील सत्ताधारी यांचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपला आहे. सध्य स्थितीत पालिकेत प्रशासक कार्यरत आहेत. तरी सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर होतील, असे सांगितले जात आहे.