
तेलंगणातील के. चंद्रशेखऱ राव यांचे सरकार पाडून काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून सध्या तेलंगणामध्ये सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री जाहीर केले असून येत्या 7 डिसेंबर रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हैदराबादमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक झाली. तिथे सर्वानुमते रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.’
























































