
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा मराठी चित्रपट खुपच गाजला. ‘सैराट’मध्ये नागराज यांनी आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या नव्या जोडीला मोठ्या पडद्यावर आणले. यानंतर या चित्रपटाने इतिहास घडवला आणि मराठी चित्रपटसृष्टीत 100 कोटींचा गल्ला जमवणारा तो पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटावरून हिंदीमध्येही ‘धडक’ नावाचा चित्रपट बनवण्यात आला.

‘सैराट’ मध्ये आर्चीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू रातोरात स्टार झाली. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच वर्ष झाली असली तरी रिंकूवरील चाहत्यांचे प्रेम कमी झालेले नाही. रिंकू देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

‘सैराट’नंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळाला. यानंतर ती ‘कागर’ चित्रपटामध्येही दिसली. या दरम्यान तिने आपले वजनही कमी केले. आता ती अधिकच खुलून दिसत आहे.
रिंकूने वजन कमी करण्याचे मनावर घेतले आणि सकाळ-संध्याकाळ डाएट सुरू केला. वजन कमी करण्यासाठी तिने गोड खाणेही सोडून दिले. 2020 मध्ये रिंकूने जवळपास 20 किलो वजन कमी केले.
विशेष म्हणजे रिंकूने वजन कमी करण्यासाठी कोणताही ट्रेनर ठेवला नाही. ट्रेनर आणि डाएटिशियन म्हणून तिच्या आईनेच काम केले. तिच्या खाण्या-पिण्याची आणि व्यायमाची काळजी आईनेच घेतली.



























































