
सामना प्रतिनिधी । लातूर
रेणापूर तालूक्यातील मोटेगाव शिवारातील सोयाबीन व हरभऱ्यानी भरलेल्या 33 गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्या. या चोरीमुळे शेतकऱ्याचे 65 हजारांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी मुकुंद भीमराव सोळंके रा. मोटेगाव ता. रेणापूर यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामराव सोमवंशी आणि मुकुंद सोळंके यांचे मोटेगाव शिवारातील गट नं. 125 मधील शेतातील खोलीमध्ये ठेवलेले सोयाबीन व हरभऱ्याचे 33 कट्टे (किंमत ६५,००० रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































