संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी बीडमध्ये आक्रोश मोर्चा

12

उदय जोशी । बीड

भीमा-कोरेगाव शौर्य स्तंभावर गेलेल्या दलित समाज बांधवावर दगडफेक करून दंगल घडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही. भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

शुक्रवारी दुपारी बीडमध्ये रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसह राज्यभरात दलित बांधवावर होत असलेले हल्ले गंभीर आहेत. देशभरात अन्यायाच्या घटनेत वाढ होत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांची मालिका सुरू आहे. अमानुष हल्ले, नग्न धिंड आणि सामाजिक बहिष्कार असे प्रकार वाढले आहेत. जामनेरची नग्न करण्याची घटना असो की, उदगीर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा घटना देशभरात दलितांवर अन्याय वाढतच चालला आहे. या सर्व मुद्द्यावर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि घटनेचा निषेध करण्यासाठी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिल्यानंतर बोलताना रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी सरकारच्या धोरणांवर तोफ डागली.

आपली प्रतिक्रिया द्या