
माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवरून सचिनने ही माहिती दिली आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
सचिनने ट्विटरवर म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सर्व काळजी मी घेत आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी घरातच क्वारंटाईन झालो असून डॉक्टरांनी सांगितलेली सर्व काळजी घेत आहे असे सचिनने म्हटले आहे.
तसेच सचिनाने आपली काळजी घेणार्यास वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचे आभार मानले असून सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.





























































