
संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे येथील खाडीत सक्शन वापरून वाळूचा बेकायदा उपसा सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून होत आहे.
सध्या वाळू उत्खननावर बंदी आहे. अशा वेळी सक्शन पंप वापरून राजरोस वाळू उपसा करण्याचे काम सुरु आहे. गेले काही महिने या खाडीपट्ट्यात सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करणे बंद होते. मात्र, आता पुन्हा वातावरण शांत आहे. याचा फायदा घेत सक्शन पंप लावून वाळू उपसा करण्याचे काम सुरु केले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सक्शन पंपाला बंदी असतानाही दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु आहे. या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.





























































