लाचखोर उत्पादन शुल्क निरीक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परमिट रूम, बीअर बारच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी 15 हजारांची लाच घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे. शहाजी आबा पाटील (56) असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदारांच्या परमिट रूम, बीअर बारच्या परवान्याचे नूतनीकरण करावयाचे होते. यासाठी पाटील याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने सोमवारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. पडताळणीत पाटील याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी उत्पादन शुल्क कार्यालयात सापळा रचून पाटील याला रंगेहाथ पकडले.