
वादळामुळे शेतामध्ये तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने शेतकऱयाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे रविवारी सकाळी घडली. विजय साहेबराव पवार (वय 46) असे मृत शेतकऱयाचे नाव आहे.
विजय पवार हे रविवारी सकाळी आपल्या शेतामध्ये डाळिंब बागेला औषध मारत होते. शनिवारी झालेल्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून त्यांच्या शेतात पडलेल्या होत्या. या तारेतून वीजप्रवाह सुरू असल्याने पवार यांचा झालेला विजेचा धक्का बसला. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने संगमनेरमधील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पवार यांचे चुलतभाऊ भाऊसाहेब रामनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. सहायक फौजदार विष्णू आहेर तपास करीत आहेत.



























































