
‘संगमनेर तालुक्यात अवैध धंदे सुरूच’ या मथळ्याखाली दैनिक ‘सामना’तून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जागे झालेल्या शहर पोलिसांनी येथील दोन-तीन कसाई आणि मटका पंटरवर लुटूपुटूची कारवाई केली. मात्र, शहरातील मटका किंग आणि मोठय़ा कत्तलखान्यांवाले मोकळेच असल्याचे चित्र आहे.
शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई करत दिल्ली नाका परिसरातील जहागीरदार वाडा येथे टपरीच्या मागे मटका घेणाऱयाला ला अटक केली. तर, दुसरीकडे दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे 600 किलो गोवंश मांस जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील एकजण फरार आहे.
रियाज अब्बास पठाण (रा. सुकेवाडी रोड, विजयनगर, संगमनेर) या मटका घेणाऱया पंटरला अटक केली आहे. तर कत्तलखान्यात दोन ठिकाणी छापे टाकत आयाज हबीब कुरेशी आणि साद मुश्ताक कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, आयाज कुरेशीला ताब्यात घेतले आहे. तर साद कुरेशी फरार झाला आहे. तसेच मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे छापा टाकून साहिल मुश्ताक कुरेशी (सहारा कॉलनी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.



























































