संगमेश्वर येथे 13 वर्षांच्या मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर शहरातील गोवळकोट रोड येथील एका गृहसंकुलातील रहिवासी असलेल्या 13 वर्षाच्या मुलाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही धक्कादायक घटना मंगळवार 7 जून रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

इस्माईल सलील काझी असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील परदेशी असतात तर गोवळकोट रोड येथील घरामध्ये तो, त्याची आई आणि आजी राहते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इस्माईलने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस येताच सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिपळूण पोलीस स्थानकातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.