
सामना ऑनलाईन । मुंबई
गोरेगावातील मराठी माध्यमाची प्रसिद्ध शाळा सन्मित्र मंडळ विद्यामंदिरचे यंदाचे हिरकमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त 6 जानेवारी 2019 रोजी माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था सदस्य यांचे स्नेहसंमेलन होणार आहे. ‘सन्मित्रोत्सव’ नावाने होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सन्मित्र मंडळ माजी विद्यार्थी संघाच्या कार्याध्यक्ष विशाखा नाईक-कुलकर्णी यांनी केले आहे.
संस्था आणि माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या ‘सन्मित्रोत्सव’ या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन,सांस्कृतिक कार्यक्रम आणि आजी- माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. श्रीधर फडके यांची संगीतसंध्या हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. सन्मित्रोत्सवात माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह विप्लव अवसरे (संपर्क क्रमांक 9892227999), सन्मित्रोत्सवचे समन्वयक निलेश ताटकर (संपर्क क्रमाक 9820658856) यांच्याशी संपर्क साधावा. किंवा www.sanmitrosav.com वर नोंदणी करावी.
आतापर्यंत सुमारे 900 हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. माजी विद्यार्थ्यांमध्ये 25 सीए, 25 डॉक्टर, 10 वास्तूविशारद आणि अभियंत्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार अतुल भातखळकर, नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांची विशेष उपस्थिती असेल.



























































