केरळच्या रस्त्यावर साडी नेसून स्केटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्केटिंग करायला अनेकांना भीती वाटते, पण चांगला सराव केला तर या खेळात जम बसतो. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ती चक्क साडी नेसून स्केटिंग करताना दिसते. तिचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीने केरळची पारंपरिक पांढरी आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली आहे आणि केसांमध्ये गजरा माळला आहे. पायात शूज घालून स्केटबोर्डवर ती आरामात राईड करत आहे. तसेच आजूबाजूच्या लोकांना हात जोडून नमस्ते म्हणत आहे. केरळमधील निसर्गसौंदर्याच्या पार्श्वभूमीवर ती दिमाखात स्केटिंग करत आहे. तिचे नाव लॅरिसा आहे. ट्रव्हेल इन्फुएंसवर अशी तिची ओळख आहे. ती मुंबईची रहिवासी असून तिला फिरायला आवडतं. प्रवासाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.