शेफ सर्वेश जाधवची कमाल, 28 राज्यांची पारंपरिक मिठाई बनवण्याचा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्याचे शेफ सर्वेश जाधव यांनी देशाच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची ओळख करून देत अनोखा विक्रम केला आहे. सर्वेश यांनी देशातील 28 राज्ये आणि प्रत्येक राज्याची एक खासियत असणारी पारंपरिक मिठाई बनवली.

प्रत्येक मिठाईचे वजन 2800 ग्रॅम एवढे होते. तेदेखील 2 तास 8 मिनिटांत. यामध्ये 28 केटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वेशने छत्तीसगढचा खुर्मा, गोव्याच्या बेबिन्का, झारखंडची तीळ बर्फी, महाराष्ट्रचे मोदक, पंजाबचे पिन्नी, तामिळनाडूचे पसायम, पश्चिम बंगालचे रसगुल्ला, गुजरातची बासुंदी असे 28 गोड पदार्थ कमी वेळेत तयार केले