13 वर्षांपासून फरार असलेल्या 14 गुन्हेगारांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तब्बल 13 वर्षांपासून पोलिसांना पाहिजे असलेल्या वाँटेड 14 संशयित आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. यामध्ये संशयितांवर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका सायकल चोरटय़ालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत गेल्या 13 वर्षांपासून विविध गुह्यांमध्ये पाहिजे असलेल्या 14 संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. सुनील वामन फडतरे (वय 42, रा. संभाजीनगर), प्रतीक भगवान मिसाळ (वय 34), पंकज भागवत मिसाळ (वय 32, दोघे रा. संभाजीनगर), गौरव जीवनदास शहा (वय 35, रा. संभाजीनगर) यांच्यावर 14 वर्षांपूर्वी गुन्हे दाखल होते. गेल्या चार वर्षांपूर्वी गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपींनाही शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे.

अन्सार गफूर आतार (वय 48, रा. शनिवार पेठ), राहुल गोरखनाथ सोनावणे (वय 32, रा. मल्हार पेठ), योगेश दत्तात्रय शिंदे (वय 33, रा. शनिवार पेठ), राजेंद्र अनिल भोसले (वय 49, रा. मंगळवार पेठ), दशरथ कुमार कांबळे (वय 45, रा. पंताचा गोट), रवींद्र विठ्ठल खरात (वय 48, रा. केसरकर पेठ), योगेश विठ्ठल चोरगे (वय 38, रा. रविवार पेठ), नारायण मारुती चौधरी (रा. लोअर परेल, मुंबई), सचिन सीताराम कोळपे (रा. संगम माहुली, सातारा), सनी उर्फ संतोष नंदकुमार शिंदे (वय 37, रा. मल्हार पेठ) अशी संशयितांची नावे आहेत.

दरम्यान, सायकलचोरीप्रकरणी अविनाश राजाराम भिसे (वय 26, रा. प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 28 रोजी महामार्गालगत असलेल्या अपार्टमेंटमधून सायकल चोरीला गेली होती. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयिताला पकडल्यानंतर त्याने सायकलचोरीची कबुली दिली आहे.