
मराठी साहित्यातील विज्ञान कथेचा प्रवाह ओघवता ठेवून विज्ञान कथालेखकांची नवी फळी निर्माण व्हावी, या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान कथालेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ते 26 जून 2022 (वेळ – सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत) या कालावधीत होणाऱया या सशुल्क कार्यशाळेत नामवंत विज्ञान कथालेखकांचे मार्गदर्शन तसेच होतकरू लेखकांना प्रत्यक्ष विज्ञान कथालेखनाचा अनुभव मिळणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱया 24 व्यक्तींना प्रवेश मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क-मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई-400022. दू. क्र. (022) 24054714/2405 7268.



























































