
जगात चीन, रशिया, हिंदुस्थान आणि अमेरिका असे मोठे क्षेत्रफळ असलेले देश आहेत. या देशांची लोकसंख्या कोटींच्या घरात आहे, पण एखाद्या देशाची लोकसंख्या फक्त 27 एवढीच आहे, हे वाचून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, पण इंग्लंडमध्ये असा एक देश आहे, ज्याचे क्षेत्रपळ 250 मीटर आहे.
‘सीलँड’असे या देशाचे नाव आहे. इंग्लंडमधील सफोक या समुद्रकिनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. हा छोटासा देश एका उध्वस्त सागरी किल्ल्यावर वसलेला आहे, जो दुसऱ्या महायुद्धात बांधला गेला होता. हा किल्ला ब्रिटनने बांधला होता, जो नंतर रिकामा करण्यात आला, तेव्हापासून सीलँड (मायक्रो नेशन) वेगवेगळ्या लोकांच्या ताब्यात गेला.
9 ऑक्टोबर 2012 रोजी, रॉय बेट्स नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला सीलँडचा राजकुमार घोषित केले, जो आता मरण पावला आहे. रॉय बेट्सच्या मृत्यूनंतर, सीलँडवर त्याचा मुलगा मायकेल हा राज्य करतो. वास्तविक ज्या देशांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही, अशा देशांना मायक्रो नेशन असे म्हटले जाते. हे देश म्हणजे एका देशाचाच भाग असतात.
मायक्रो देश सीलँडचे क्षेत्रफळ 250 मीटर आहे, गडावर वसलेला हा देश आता जवळपास उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. सीलँडला रफ फोर्ट असेही म्हणतात. सीलँड समुद्राच्या मधोमध अवघ्या 250 मीटरवर पसरलेला आहे, त्यामुळे इथल्या लोकांकडे राहण्यासाठी कोणतेही साधन नाही. जेव्हा इतर देश आणि लोकांना या देशाबद्दल माहिती मिळाली तेव्हा मोठ्या प्रमाणात देणग्या येऊ लागल्या. देणगी मिळाल्याने येथील लोकांच्या जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता झाली.
सीलँड हा जगातील सर्वात लहान देश असला, तरीही प्रत्यक्षात जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी असून तो इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी वसलेला आहे.
























































