सनी लिओनीवरील वेबसिरीजचा दुसरा भाग लवकरच, पाहा ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सनी लिओनीवर देखील सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकते म्हणून डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला

सामना ऑनलाईन । मुंबई

पॉर्न स्टार सनी लिओनी हिच्या आयुष्यावरील करेनजित कौर : द अनफोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी या वेबसिरीजचा दुसरा भाग येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. सनीच्या चाहत्यांना झी5 वर 5 एप्रिलपासून या वेबसिरीजचा दुसरा भाग बघता येणार आहे. सनीने नुकताच या दुसऱ्या भागाचा ट्रेलर तिच्य़ा ट्विटरवरून शेअर केला आहे.

या वेबसिरीजच्या पहिल्या भागात एक पंजाबी मुलगी करणजीत कौर ते एक पॉर्न स्टार सनी लिओनी असा तिचा संपूर्ण प्रवास दाखविण्यात आला होता. आर्थिंक संकटात असलेल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी सनी कशा प्रकारे पॉर्न चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश करते हे त्या वेब सिरीजमध्ये दाखविण्यात आले होते.

दुसऱ्या भागात सनीचा हिंदुस्थानात व नंतर बॉलिवूडमध्ये कसा प्रवेश होतो ते दाखविण्यात आले आहे. यात एक आफ्रिकन अभिनेता सनीचा नवरा डॅनियल वेबरची भूमिका करत आहे.