
पाकिस्तानमध्ये आघाडी सरकार स्थापनेसाठी एकत्र आलेल्या पीएमएल आणि बिलावल भुत्तोंची पीपीपी यांच्यात वाटाघाटी सुरू असतानाच, पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष नवाज शरीफ यांनी त्यांचे धाकटे बंधू आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आणि मुलगी मरियम नवाझ यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली आहे. आघाडी सरकारला पाठबळ देणाऱया प्रमुख पक्षांच्या पाठबळावर ते सर्वसाधारण बहुमताचा आकडा सहज पार करतील अशी चिन्हे आहेत. दरम्यान, कुणालाही बहुमत न मिळाल्याने पाकिस्तानात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता.




























































