शाहूपुरीत नववीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाहूपुरी येथील प्रणोती पार्कमध्ये राहणाऱ्या नववीतील एका शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सकाळी अकरा वाजता घडली. श्रावणी अतुल काटकर (वय 15) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.

साताऱ्यातील एका शाळेमध्ये इयत्ता नववीत श्रावणी शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या शाळेला दिवाळीची सुटी लागल्याने ती घरीच होती. सकाळी तिने राहत्या घरात अचानक गळफास घेतला. हा प्रकार तिच्या घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तिच्या गळ्याचा फास सोडवून तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रावणीने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही.

श्रावणीच्या आत्महत्येमुळे तिच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार सचिन माने हे अधिक तपास करीत आहेत.