
‘वंडर ऑफ द सीज’ नावाचे जगातील सर्वात मोठे जहाज मार्च 2022 मध्ये शांघाय येथून रवाना होणार आहे. या जहाजाच्या पहिल्या सफरचे बुपिंग सुरू झाले आहे. दोन हजार आरामदायी खोल्या असलेल्या जहाजात एकावेळी सुमारे सात हजार प्रवासी राहू शकतात. वंडर ऑफ द सीज जहाज 10 मजली असून त्यावर 18 डेक आणि सुमारे तीन हजार आलिशान सूट्स आहेत.
रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलने पहिल्यांदा वंडर ऑफ द सीज जहाजाचे फोटो शेअर केले आहेत. पुढच्या वर्षी मार्च ते नोव्हेंबर दरम्यान शांघाय ते जपानदरम्यान जहाजाची पहिली ट्रीप होईल. नऊ दिवस आणि आठ दिवसांच्या या सफरीत टोकियो, माऊंट फुजी, कुमामोटो, कागोशिमा, इशिगाकी आणि मियाजाकी यांसारख्या बंदरांतून जहाज मार्गस्थ जाईल.
वंडर ऑफ द सीज जहाजावर दोन हजार रोपांचे सेंट्रल पार्क आहे. जहाजाची लांबी 1188 फूट आणि रुंदी 210 फूट आहे. त्याचे वजन 2.37 लाख टन आहे. जिम, स्पोर्टस् झोन, बास्केटबाल, व्हॉलीबॉल कोर्ट, मिनी गोल्फदेखील आहे.



























































