
सामना प्रतिनिधी । मुंबई
राफेल विमान खरेदी कराराची कागदपत्रे चोरीला जाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक केला. संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराची कागदपत्रे जर चोरीला जात असतील तर देशाच्या सुरक्षिततेच्या आघाडीवर काय परिस्थिती असेल, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. राफेल विमान खरेदीची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. त्यावर शरद पवार यांनी कडाडून टीका केली आहे.


























































