गरीबांचे आरक्षण कोर्टात टिकेल का? शरद पवार साशंक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

सामना प्रतिनिधी, कोल्हापूर

ओबीसी, एस़ टी. आणि घटनेने दिलेले इतर आरक्षण टिकेल. त्याला कोणताच धक्का लागणार नाही, पण सवर्ण आरक्षण घटनात्मक टिकेल, असे वाटत नसल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, आरक्षण कुणासाठी हा प्रश्नच आहे. त्याचा लाभ शहरातील सुशिक्षित कुटुंबातील मुलांना होईल. मात्र, खेडयातील मुले या स्पर्धेत मागे पडतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत, पण जे निर्णय गेल्या साडेचार ते पावणेपाच वर्षांत घेतले नाहीत ते आताच का घेतले जात आहेत, असा सवाल पवार यांनी करून मोदींविरोधात जनादेश असून लोक नक्कीच बदल घडवतील असा आशावादही बोलून दाखवला.

महाडिक, उदयनराजे वेटिंगवर
काँग्रेससोबत बोलणी करताना फक्त लोकसभेच्या 48 जागांचा विषय असून त्यातील 40 जागांचा विषय संपला आहे. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या मताचा सन्मान ठेवला जाईल, असे सांगत पवार यांनी धनंजय महाडिक, तसेच उदयनराजे यांच्याबाबतही संभ्रमावस्थाच ठेवली आहे.