
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण आणि प्रचार-प्रसारासाठी समर्पित वांद्रे येथील शारदा संगीत विद्यालयाचा ९९ वा गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवार, १३ ऑगस्टपासून सुरू होत आहे. विद्यालयाच्या सभागृहात हा उत्सव १६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या उत्सवात सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत विद्यालयाचे विद्यार्थी गुरुजनांच्या उपस्थितीत आपले गायन, वादन व नृत्याची कला सादर करतील. त्याशिवाय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभही पार पडणार आहे. सर्व संगीतप्रेमींनी या उत्सवास हजेरी लावावी, असे आवाहन विद्यालयाच्या प्रमुख वनिता नारंग आणि कार्यकारी प्रमुख ललिता पाटील यांनी केले आहे.





























































