
मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह एका कुख्यात गुंडांकडून शुभेच्छांच्या फलकाचे आपल्या वाढदिवसानिमित्त जाहीर प्रदर्शन करून दहशतीचे वातावरण निर्माण करू पाहणारे मिंधे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा आता शस्त्र नियमभंगाचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी चक्क तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी करत पोलीसांकडे तक्रार दिली आहे. विषेश म्हणजे यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावर उपस्थित होते.





























































