मोदी सरकारला जबरदस्त धक्का, शिरोमणी अकाली दल ‘एनडीए’तून बाहेर

केंद्रातील मोदी सरकारला जबरदस्त धक्का बसला असून शिरोमणी अकाली दलाने ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विधेयकाला विरोध करत शिरोमणी अकाली दल ‘एनडीए’तून बाहेर पडले आहे. शनिवारी कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी कृषी विधेयकावरून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनीही राजीनामा दिला होता.

दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ‘एनडीए’मधून बाहेर पडणारा शिरोमणी अकाली दल दुसरा मोठा पक्ष आहे. याआधी महाराष्ट्रात शिवसेनेना एनडीएतून बाहेर पडली होती. शिरोमणी अकाली दल गेल्या 22 वर्षांपासून ‘एनडीए’चा हिस्सा होता.

मोदी सरकारने नुकतेच पास केलेल्या कृषी विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. विरोधकांनी देशभरात रान उठवले असतानाच शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकारला झटका देत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत एनडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या