साहेब, तुमची साथ सोडणार नाही, निष्ठावंतांचा सोशल मीडियावरून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने जरी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला असला तरी निष्ठावंत शिवसैनिकांनी ते कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. निष्ठावंत शिवसैनिकांनी साहेब, तुमची साथ आम्ही सोडणार नाही असेच सोशल मीडियावर सांगितले आहे.