
अमराठी टॅक्सी व रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्यासाठी शिव अवजड वाहतूक चालक सेनेच्या वतीने शिवसेना शाखा क्रमांक 143 येथे मराठी शिकवणी अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले आहेत. संघटनेचे अध्यक्ष संदीप मोरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेले हे मराठी अभ्यास वर्ग विभाग संघटक पद्मावती शिंदे, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, सुरेश पाटील, प्रज्ञा सपकाळ, उपाध्यक्ष उमर सिद्दीकी, अशोक
कांबळे, संघटक वनिता बोरगे, साजिया सय्यद, शाखाप्रमुख किरण सावंत, सुवर्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.




























































