
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलन व विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ”दिल्लीच्या रस्त्यावर तरुणींशी अमानुषपणे केलेले गैरवर्तन अत्यंत क्लेशदायक” अशी टीका करत जोशी यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.
It is painful to see young students from different parts of the country assembled for days on the streets of New Delhi. Their anxieties and concerns regarding the examination system are genuine and must be handled with empathy and a desire to find a lasting solution. I fervently…
— Dr. Murli Manohar Joshi (@DrMurliManohar_) July 23, 2026
”देशाच्या विविध भागांतून आलेले तरुण विद्यार्थी नवी दिल्लीच्या रस्त्यांवर कित्येक दिवस एकत्र आलेले पाहणे अत्यंत वेदनादायी आहे. परीक्षा पद्धतीबाबत त्यांच्या मनात असलेली चिंता आणि त्यांच्या अडचणी रास्त आहेत; त्यामुळे त्या सहानुभूतीने आणि शाश्वत उपाय शोधण्याच्या ध्येयानेच हाताळल्या गेल्या पाहिजेत. मला प्रामाणिकपणे असे वाटते की, याकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहिले जाऊ नये आणि बळाचा वापर करून हा प्रश्न दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. अगदी तरुण मुलींशीही अत्यंत निर्घृणपणे गैरवर्तन केले गेले, हे पाहणे फार क्लेशदायक आहे. बळाचा असा वापर देशातील समाजातील एका मोठ्या घटकाला ‘विकसित भारत’ या राष्ट्रीय ध्येयापासून दूर करेल” असे मुरली मनोहर जोशी यांनी ट्विट केले आहे.




























































