
प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा उद्या 20 नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
पत्रकार, समाजसुधारक आणि फर्डे वत्ते केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे म्हणून प्रबोधनकार डॉट कॉम हे संकेतस्थळ 17 सप्टेंबर 2010 रोजी सुरू करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या बारा वर्षांत तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाला असून सोशल मीडियाचा पसाराही अवाढव्य झाला आहे. माहितीचे जाळे डेस्कस्टॉपवरून स्मार्टपह्नवर आले आहे. ही बाब लक्षात घेत प्रबोधन प्रकाशनचे प्रबोधनकार डॉट कॉम हे संकेतस्थळ आता नव्या स्वरूपात आणले जात आहे. नवे संकेतस्थळ सोशल मीडिया आणि मोबाईल फ्रेंडली असणार आहे. या नव्या स्वरूपातील संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी साडेसात वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील, असे कार्यक्रमाचे निमंत्रक, प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त सुभाष देसाई आणि प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक सचिन परब यांनी सांगितले.
n प्रबोधनकारांचे संपूर्ण साहित्य आता प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळावर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रबोधनकारांची सर्व पुस्तके, पुस्तकबद्ध न झालेले साहित्य, विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख, त्यांनी पुस्तकांसाठी लिहिलेल्या प्रस्तावना असा विपुल साहित्यखजाना यात असेल.





























































