40 डोक्याच्या रावणाने प्रभु श्रीरामाचं धनुष्य गोठवलं, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर शरसंधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही शिवसेनेसह शिंदे गटाला दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर शरसंधान साधले. 40 डोक्याच्या रावणाने प्रभु श्रीरामाचं धनुष्य गोठवलं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.