शिवसेनेचा झंझावात, भोकरमध्ये एकाच दिवशी 31 गावात शाखांचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भोकर

भोकर तालुक्यात शिवसेना तालुकाप्रमुख अमोल पवार यांच्या नेतृत्वाखाली झंझावात घोडदौड करीत असून एकाच दिवशी तालुक्यातील तब्बल 31 गावात शाखा उघडून नामफलकांचे अनावर केल्याने संपूर्ण तालुक्यात भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी व जयंतीचे औचित्य साधून तालुक्यात मरगळलेली शिवसेना सतेज करत गाव तेथे शाखा स्थापन करून शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी अशोकरावांच्या मतदारसंघात एकाच दिवशी 31 शाखांच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी केले होते. यानुसार तालुक्यातील 31 गावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, लोकसभा संघटक डॉ.मनोज भंडारी, जिल्हा संघटक दयाल गिरी, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, दत्ता पाटील पांगरीकर, धनराज पाटील पवार यांच्या हस्ते नामफलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी भोकर तालुकाप्रमुख अमोल पाटील पवार, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, संतोष आलेवाड, नारायण पाटील पोमनाळकर, बालाजी येलपे, राजू पोगरे, साहेबराव भोंबे, सुभाष नाईक, गंगाधर महादावाड, परमेश्वर पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या एकाच दिवसात रायखोड, सायळ, नागापुर, चिंचाळा, सोणारी, सावरगाव, कांडली, पिंपळढव, मोघाळी, हळदा, धारजनी रहाटी, पोमनाळा, डोर, रेणापूर, कोळगांव बु., कोळगांव खु, गारगोठवाडी, पाळज, दिवशी बु, दिवशी खु, महागाव, किनी, कासारपेठ तांडा, देवठाना, सोमठाणा, रिठा, जाकापूर, हस्सापूर, पांडूर्णा, कामंनगाव आदी ठिकाणी शाखा नाम फलकाचे अनावरण केले असून भोकर तालुक्याच्या शिवसेना इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाव तेथे शाखा उघडल्या आहेत. त्यामुळे आता अशोकरावांच्या मतदारसंघात शिवसेनेला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.