दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी सण मोठय़ा उत्साहाने साजरा होत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांमधून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा 205 च्या वतीने दीपावलीनिमित्ताने प्रभागातील नागरिकांना स्वस्त दरात रवा, मैदा वाटपाचा शुभारंभ विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेवक दत्ताराम पोंगडे, शाखाप्रमुख जयसिंग भोसले, महिला शाखा संघटक अनुराधा इनामदार यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात लता रहाटे, श्वेता राणे, दिव्या घाडीगावकर, वैभवी चव्हाण, रूपाली चांदे, कल्पना ओहळे आदी उपस्थित होते.

विठ्ठल उमप फाऊंडेशन, अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत आरे येथील पेरू बागमधील आदिवासी बांधवांना मोफत रेशन किट वाटप करण्यात आले. दिवाळीनिमित्त फराळासाठी लागणारे साहित्य दिल्याबद्दल येथील महिलांनी दोन्ही संस्थांचे आभार मानले. याप्रसंगी अध्यक्ष गायक नंदेश उमप, सुनिता नागरे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वनिता सुतार, प्रसाद मराठे, ज्ञानेश्वर कांबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

प्रतीक्षा नगर शाखा क्रमांक 173 येथे प्रल्हाद ठोंबरे (मास्तर) प्रतिष्ठान तर्फे विभागातील नागरिकांना दिवाळीनिमित्त पणत्या व उटणे वाटप करण्यात आले. या प्रसंगी विभाग क्रमांक 9 चे विभागप्रमुख मंगेश सातमकर, महिला विभाग संघटक रिताताई, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख संजय म्हात्रे, प्रल्हाद ठोंबरे (मास्तर), प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योती ठोंबरे, दांडेकर, हर्षला नाईक, सविता जाधव आदी उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनोहर सरवणकर कुटुंबीयांच्यावतीने मढ येथील अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांना फटाके, मीठाई, फराळ, कपड्यांचे वााटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अशोक पटेल, हरीश्चंद्र राणे, सरवणकर कुटुंबीय आणि बुथेलो ट्रस्टच्या संचालिका दीपाली चव्हाण उपस्थित होतो.

चांदिवली विधानसभा महिला उपविभाग संघटक मनिषा कृष्णा नलवडे यांनी दीपावलीनिमित्त किभागातील जनतेस सुगंधी उटणे व पणतीचे वाटप करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब, संजना मुणगेकर, उपविभागप्रमुख आण्णामलाई, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.