नागरिकांच्या समस्या सर्वोत्तोपरी सोडविणार! : शिवसेना आमदार राहुल पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शहरालगतच्या धाररोड येथील रस्ता सिमेंट काँक्रीटसह चौपदरीकरण्याच्या कामास आज आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याहस्ते प्रांरभ झाला. वर्षानूवर्ष अंत्यंत निकृष्ट असलेल्या या रस्त्याच्या समस्येमुळे परिसरातील अनेक गावचे नागरिक त्रस्त होते. त्यामुळे चौपदरीकरणाबरोबरच दुतर्फा नाल्याचेही बांधकाम करण्यात येणार आहे. वाढत्या रहदारीचा प्रश्न लक्षात घेता, फुटपाथसह दुभाजकही टाकण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांच्या समस्या सर्वोत्तोपरी सोडविण्याची ग्वाही शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी दिली.

परभणी येथील धार रोडवरील रस्ता चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याहस्ते आज पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रत्यक्ष कामास आजपासून सुरुवात करण्यात आल्याने लगतच्या 16 गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 700 मिटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास ६ कोटी रुपयांचा निधी आमदार डॉ. पाटील यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाला आहे. सदर रस्ता निर्माण करण्याच्या प्रत्यक्ष कामास भूमिपूजनाने सुरुवात झाली. यावेळी लगतच्या 16 गावच्या नागरिकांनी शिवसेना आमदार डॉ. पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार केला.