
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्यांच्या या दौऱयाबद्दल देशभरातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्षांमध्ये कमालीची उत्सुकता तर आहेच, पण ‘राममंदिरा’च्या मुद्दय़ावरून हिंदूंमध्येही नवचैतन्याची लाट उसळली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱयात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून अनेकजण अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहेत. मुंबई-ठाण्यातूनही मंगळवारी रात्री वारकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांच्या तुकडय़ा अयोध्येला निघाल्या. मुंबईतील स्थानकांवर आता ‘जय श्रीराम’चाच गजर होऊ लागला आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून शिवसैनिक जाणार
राज्याच्या प्रत्येक जिल्हय़ातून शिवसैनिक अयोध्येला रवाना होणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कल्याण, संभाजीगर, गोंदिया, बीड, नंदुरबार, नागपूर, भंडारा, पुणे, ठाणे येथून शेकडोजण दौऱयात सहभागी होणार आहेत. खास बस, ट्रेन, खासगी वाहनांनी हे सर्वजण अयोध्येत पोहचतील. उद्या सकाळी ठाण्याहून विशेष एक्प्रेसने ठाणे आणि पालघरमधील शिवसैनिक रवाना होतील.
उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौऱयावर असणार आहेत. स्थानिक धार्मिक उत्सव, शरयू नदीची महाआरती आणि राममंदिराच्या मुद्दय़ावरून जनसंवाद असा भरगच्च दौरा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे यांच्या या यात्रेला सर्वच थरातून पाठिंबा मिळत असून या यात्रेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी मुंबई-ठाण्यातून शेकडोजण अयोध्येकडे रवाना झाले. प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्र्ााr यांच्या नेतृत्वाखाली वारकरी तसेच कीर्तनकारांची पहिली तुकडी ‘रामकृष्ण हरी’चा जयघोष करत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसहून मध्यरात्री विशेष वाराणसी एक्प्रेसने रवाना झाली. काही वारकरी कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ येथे सामील झाले आणि शेकडो वारकऱयांचा हा जथा अयोध्येकडे मार्गस्थ झाला. वाराणसी येथे गंगास्नान करून हे सर्व वारकरी-कीर्तनकार अयोध्येला प्रस्थान करणार आहेत.




























































