
सामना ऑनलाईन । मुंबई
कोकणातील लोकसभेच्या सर्व 7 जागा जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप युती सज्ज झाली असून येत्या सोमवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांतील युतीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी युतीची स्थापना केल्यापासून कोकण हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला राहिला आहे. कोकणातील कष्टकरी जनतेचे हित तसेच महिला व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी युती नेहमीच तत्पर राहिली आहे. नवी मुंबईतील सेक्टर-12 मधील गावदेवी मंदिराजवळ नामदेव भगत शाळेच्या पटांगणार सोमवारी दुपारी 3 वाजता हा महामेळावा होणार आहे.




























































