
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यासाठी यंदाचा ’संविधान दिन’ खास ठरला. संविधानाचे निर्माते ’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या नावाच्या पुरस्काराने शेवाळे यांचा दिल्लीत गौरव करण्यात आला. ’दलित कल्याण फाऊंडेशन’ आणि ‘बुद्धा क्रिएशन ऑफ इंडियन सिनेमा’ यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर अॅवॉर्ड’ ने गौरविण्यात येते. यंदाच्या वर्षी देशभरातील केवळ पाच लोकप्रतिनिधींना हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
























































