श्रेयस पडला ‘श्रीवल्ली’च्या प्रेमात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्याने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या गाण्यावरील रील्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जूनसाठी डबिंग करणारा अभिनेता श्रेयस तळपदेदेखील ‘श्रीवल्ली’च्या प्रेमात पडला आहे.

‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स करतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. श्रेयस सध्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात काम करणारा सहकलाकार संदीप पाठकने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘‘पुष्पा हिंदीत हीट होण्यामागे श्रेयसचेदेखील मोठे योगदान आहे. त्याच्यासोबत सेटवर असताना पुष्पाच्या गाण्यावर रील करायचा मोह कुणाला आवरणार नाही,’’ असे कॅप्शन संदीपने दिले आहे.