वैभव तुझा नंबर लागणार; पण जरा थांब! श्रेयसने केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस कधी पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ‘टीम इंडिया’चा कर्णधार श्रेयस अय्यरने त्याच्या प्रतीक्षेत आणखी भर घातली. वैभवला संधी नक्की मिळेल, मात्र त्यासाठी त्याला संयम ठेवावा लागेल, असे श्रेयसने स्पष्ट केले.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यावर पावसाने पाणी फेरल्याने पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. मात्र, वैभवला एकाही सामन्यात अंतिम अकरात स्थान न मिळाल्याने चर्चेला उधाण आले आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या सामन्यानंतर वैभवला संधी का दिली नाही, असा थेट सवाल श्रेयसला विचारण्यात आला. त्यावर त्याने वैभवला संधी मिळेल, कधीकधी प्रतीक्षा करावी लागते. आमच्याकडे दोन चांगले सलामीवीर आहेत. वैभवशी या विषयावर आमची चर्चा होत असते, असे सांगितले.