सिद्धार्थ मल्होत्रा व किआरा आडवाणी अडकणार लग्नबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधलं सध्याचं हॉट कपल असलेल्या किआरा आडवाणी आणि सिद्धार्थ कपूर यांनी नुकतीच रिचा चढ्ढा व फैजल अली यांच्या रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली होती. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या शेरशाह या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. त्या सिनेमाच्या सेटवर या दोघांमध्ये अफेयर सुरू झाल्याचेही बोलले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

जवळपास दीड दोन वर्षापासून एकमेकांना डेट करणाऱ्या किआरा व सिद्धार्थने त्यांचे नाते एक पाऊ पुढे नेण्याचे ठरवले आहे. किआरा व सिद्धार्थ पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे समजते. नुकतंच बॉलिवूड लाईफसोबत बोलताना सिद्धार्थने लवकरच आम्ही लग्नाच्या प्लानिंगविषयी सांगू असे सांगत चाहत्यांना त्यांच्या लग्नाची हिंट दिली होती. तसेच ते दोघे रजिस्टर पद्धतीने लग्न करून नंतर ग्रँड रिसेप्शन ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

किआरा व सिद्धार्थ हे लवकरच आणखी काही चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणाला,”काही चित्रपटांवर बोलणं सुरू आहे. काहींच्या स्क्रिप्ट आम्ही वाचतोय. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल” काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करणमध्ये देखील किआराने ती लग्न करणार असल्याचे सांगितले. जेव्हा करणने तिला सिद्धार्थविषयी विचारले होते तेव्हा ती म्हणालेली की आम्ही क्लोज फ्रेंड्स पेक्षा जास्त आहोत. त्यानंतर लग्नाच्या प्रश्नावर तिने लवकरच मी देखील लग्न करेन असे सांगितलेले.