
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंगचा बहुचर्चीत ‘सिंबा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहताना रणवीर सिंगने साकारलेला एसीपी संग्राम भालेराव हा आपल्याला अजय देवगणने साकारलेल्या ‘बाजीराव सिंघम’ची नक्कीच आठवण करून देतो.
सिंबा या चित्रपटात संग्राम भालेराव हा सिंघमकडून प्रेरणा घेऊन पोलीस दलात भरती होतो असे दाखवले आहे. मात्र तो सिंघम सारखा प्रामाणिक नसून तो भ्रष्टाचार पूर्णत: बुडालेला दाखवला आहे. मात्र त्याच्या आयुष्यात काही असं घडतं की तो भ्रष्टाचाराचा मार्ग सोडून देतो व प्रामाणिकपणाकडे वळतो.
रणवीरचा हा चित्रपट 28 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरसह सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, सोनू सूद सह अरुण नलावडे, वैदेही परशुरामी सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाकारही दिसणार आहेत. करण जोहर आणि रोहित शेट्टीचा हा बिग बजेट चित्रपट शाहरुख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर देताना दिसेल.





























































