
हिवाळ्याच्या वातावरणात बदल होतो. गार गार झोंबणाऱ्या वाऱ्यापासून शरीराचे रक्षण व्हावे याकरिता उबदार लोकरीचे कपडे आपण वापरतो. या कपड्यांप्रमाणेच उत्तम आरोग्याकरिता थंडीच्या दिवसात पोषक आणि गरम पदार्थांची शरीराला आवश्यकता असते. जेणेकरून शरीर उबदार राहू शकेल. या सुपरफूडमुळे हिवाळ्याच्या दिवसांत आजारी पडण्याची शक्यता कमी असते.
रताळे थंडीच्या दिवसांत खाणे फायदेशीर ठरते. रताळ्याच्या गडद लाल रंगात बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्व ए, कॅरोटीनोईड्स जास्त प्रमाणात आढळतात. याशिवाय लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून शरीर उत्साही राहते. हिवाळ्यात आहारात रताळ्याचा समावेश केल्यास बद्धकोष्ठता, जळजळ यासारखे त्रास कमी होतात.
खजूर हे लो फॅट फूड असून यामुळे वजन वाढत नाही. जिमला जाणाऱ्या लोकांकरिता खजूर खाणे फायदेशीर ठरते. नियमित खजूर खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते.
बदाम आणि अक्रोड आहारात संतुलीत प्रमाणात घेतल्यास मज्जासंस्थेचे आरोग्य चांगले राहते. इन्सुलिन प्रक्रिया सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यदेखील चांगले राहते. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते जे आरोग्याला फायदेशीर असते.
हिवाळ्यात नाचणी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. कॅल्शियमची कमतरता नाचणीमुळे भरून निघते. तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्याकरिताही नाचणी खावी. यामुळे अशक्तपणा भरून निघतो. नाचणी डिप्रेशन, एन्जायटी आणि इंसोमेनिया या आजारात गुणकारी ठरते.
बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर आणि फॅट असतात. अशक्तपणा असलेल्या रुग्णांचा बाजरी खाल्ल्याने खूप फायदा होता. रोजच्या आहारात बाजरीची भाकरी, बाजरीचे लाडू आणि बाजरीपासून बनवलेल्या काही पदार्थांचा समावेश केल्याने हाडे मजबूत होतात.



























































