गोरं होण्याच्या नादात महिलेने गमावली दृष्टी, कुटुंबियांनाही विषबाधा होण्याची तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता

ब्यूटी क्रीम्सचा वापर करत असताना त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका महिलेला तिची दृष्टी गमवावी लागली. एवढेच नाही तर तिच्या कुटुंबालाही पाऱ्यामुळे विषबाधा होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ब्रिटनमधील मिनेसोटा येथील एरिन बॅटडॉर्फ असे या महिलेचे नाव आहे. ही महिला ब्यूटि क्रिम्सचा वापर करत असताना तिला तिची दृष्टी गमवावी लागली. ब्यूटि क्रिम्समध्ये असलेल्या पाऱ्यामुळे तिच्या कुटुंबियांनाही विषबाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विषारी रसायनाचे प्रमाण जास्त असलेले सौंदर्य प्रसाधन ही महिला वापरत होती.

याविषयी सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मिनेसोटा पॉइझन कंट्रोल सिस्टीमसोबत डॉ. एरिन बॅटडॉर्फ यांनी दिलेल्या माहितीत तिने सांगितले की, मिनेसोटा प्रदूषण नियंत्रण एजन्सीने (MPCA) या महिलेच्या घरी एका वर्षाच्या अंतराने जाऊन दोन वेळा तपासणी केली. पहिल्या भेटीत तिने या टीमला परदेशातील स्किन व्हायटिंग उत्पादने दाखवली, पण ती आता वापरत नसल्याचे सांगितले. तिच्या घरात पाऱ्याचे प्रमाण जास्त आढळले. मुलांचे बेडरूम, घरी वापरले जाणारे टॉवेल, कपडे धुण्याची जागा येथे पारा जास्त प्रमाणात असल्याचे आढळले.

त्यानंतर सौंदर्यप्रसाधने आणि तिच्या लघवीच्या चाचण्यांमध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. 2022 साली दुसऱ्या वेळी तिच्या घरी भेट देण्यात आली तेव्हा त्यांनी स्थानिक बाजारपेठेतून दोन नवीन सौंदर्य उत्पादने खरेदी केली होती. त्यामधील पाऱ्याची पातळी अत्यंत जास्त होती.

या घटनेबाबत वैद्यकीय विषशास्त्राचे असे म्हणणे आहे की, लोकांना अशा ब्यूटि क्रिम्सबाबत माहिती नसते. कोणीही जाणूनबुजून स्वत:ला आणि आपल्या कुटुंबियांना दुखापत होईल असे वागत नाही. पारा हा असा पदार्थ आहे, ज्याचा वास येते नाही. तो साध्या डोळ्यांना दिसत नाही. ग्राहकांनी ते वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधानांमध्ये पारा आहे का, हे ओळखायचे कसे, याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांवर याविषयीचे लेबल लावलेले नसते.

सौ्ंदर्य प्रसाधनांमुळे दृष्टी गमावलेल्या महिलेने निद्रानाश, पाय दुखणे, स्नायू कमकुवत होणे, थकवा अशी अनारोग्याची अनेक कारणे डॉक्टरांना सांगितली. ही लक्षणे तिच्या शरीरात आढळल्यानंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीत तिच्या रक्त आणि लघवीमध्ये पाऱ्याचे प्रमाण वाढल्याचे आढळले.

याबाबत वैद्यकीय विषशास्त्राचे म्हणणे आहे की, पाऱ्यामुळे विषबाधा झाल्यास रुग्णाच्या हात किंवा पायांना मुंग्या येतात किंवा हे अवयव सुन्न होतात. याचा परिणाम दृष्टीवर होऊन दृष्टी कमी होऊ शकते. तसेच या व्यक्तिच्या दृष्टीत सुधारणा होऊ शकत नाही, त्यामुळे ही बाब चिंताजनक असून असे बरेच लोकं असण्याची शक्यता आहे, ज्यांच्या शरीरात पाऱ्याची पातळी जास्त असू शकते.

MPCA चे टॉक्सिक्स रिडक्शन स्पेशलिस्ट जॉन गिल्केसन यांनी याविषयी सांगितले की, अलिकडच्या वर्षांत मिनेसोटा राज्य आणि ब्रिटनच्या इतर भागांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या घरांचे सर्वेक्षण केले असता, असे आढळले आहे की, काही कुटुंब दिर्घकाळ त्वचेचा रंग गोरा करणाऱ्या उत्पादनांचा वापर करतात. असे लोकं अकार्बनिक पाऱ्याच्या संपर्कात येतात. यामध्ये शरीराचे नुकसान करणारी हानिकारक विषारी रसायने जास्त प्रमाणात असतात. याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो.

डॉ. बॅटडॉर्फ याविषयी सांगते की, या घटनेमुळे मी अत्यंत निराश झाले, कारण खात्रीशीरपणे अशाच वस्तू विकत घेतल्या होत्या ज्या हलक्या दर्जाच्या नसून सुरक्षित आहेत. पारा असलेली सौंदर्य उत्पादने संपूर्ण यूएसमधील स्थानिक मॉल्स आणि बाजारपेठांमध्ये आणि ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांद्वारे सहज उपलब्ध आहेत.

याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2020 साली मिनेसोटामध्ये एका महिलेने त्वचा गोरी करणारी क्रीम वापरल्यानंतर तिला निद्रानाश, नैराश्य, किडनीचे आजारपण, पुरळ, अशा अनेक शारीरिक लक्षणांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बॅटडॉर्फ आणि तज्ज्ञांनी जागरुक राहून उत्पादनांची नियमित चाचणी करूनच वापरण्याचे आवाहन केले आहे.