नव्या वर्षाची पार्टी जीवावर बेतली, सॉफ्टवेअर इंजिनीअर 33 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेंगळूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नव्या वर्षाची पार्टी एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला जीवावर बेतली. या तरुणाचा 33 व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घेतली आहे. शुक्रवारी मैत्रीणीच्या फ्लॅटवर गेला असताना ही घटना घडली आहे.

दिव्यांशू शर्मा असे त्या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. ही घटना केआर पुरम येथील पश्मीना वॉटरफ्रंट अपार्टमेण्ट मध्ये राहत असलेल्या मैत्रीण मोनिकाच्या फ्लॅटमध्ये घडली. तिच्या घरी तिघे जण मिळून नव्या वर्षाचा जल्लोष ,साजरा करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनिका, दिव्यांशु आणि अन्य एक मित्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने एका पबमध्ये गेले होते आणि तिथून ते 2.30 वाजता परतले. जेव्हा मित्र बेडरुममध्ये झोपले होते तर दिव्यांशु लिव्हिंग रुममध्ये झोपला होता. त्यावेळी त्याने घरात सफाई केली, असे वाटते त्याने सिगारेटची राख फेकण्यासाठी किंवा ताजी हवा घेण्यासाठी तो बाल्कनीत गेला असावा. त्यावेळी त्याचा तोल जावून तो खाली पडला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.

काही रहिवाशांनी सोयायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अलर्ट करुन या अपघाताबाबत सांगितले होते. त्यावेळी मेसेज पाहिल्यानंतर मोनिका आपल्या मित्रासोबत दिव्यांशुच्या शोधात निघाली. मोनिकाने पाहिले की दिव्यांशुचा मृतदेह व़ॉकिंग ट्रॅकच्या बाजुला पडला आहे. पोलिसांनी मृत्यूचे कारण अनैसर्गिक मृत्यू असे लिहीले आहे आणि पुढील तपास सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलाचे वडील निवृत्त भारतीय नौदल कर्मचारी आहेत. गुरुवारी रात्री दिव्यांशु आणि तीन अन्य मित्र मोनिकाच्या घरी गेले होते. त्यांनी एकत्र सिनेमा पाहिल्यानंतर ते पबला रेल