
‘फॅण्ड्री’ या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा सोमनाथ अवघडे आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे सारे विक्रम मोडणाऱ्या ‘सैराट’मुळे रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला आकाश ठोसर पुन्हा एकदा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करणार आहे. नागराज मंजुळे यांचे बॉलीवूडमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘झुंड’ या चित्रपटात सोमनाथ आणि आकाश झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील ‘आया ये झुंड है’ हे गाणे भेटीला आले आहे. यात ‘बिग बी’ यांच्यासोबत आकाश आणि सोमनाथ यांचीदेखील एक झलक पाहायला मिळत आहे. 4 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



























































