मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या

34
murder

सामना ऑनलाईन, मुंबई

राहत्या घरावरून सुरू असलेला वाद कुर्ल्यात राहणाऱ्या एका विवाहितेच्या जीवावर बेतला. पोटच्या मुलानेच आपल्या आईचा जीव घेतला. वरच्या रूमवरून खाली उतरत असताना चक्कर आली म्हणून त्या थांबल्या असता मुलाने त्यांना खाली ढकलले. यात डोळय़ाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मिमादेवी कवारिया (55) असे त्या महिलेचे नाव होते. त्या त्यांच्या दोन मुलांसोबत ठक्कर बाप्पा कॉलनीतील वसंत नगर येथे गल्ली नंबर 2 मध्ये राहत होत्या. तळ अधिक एक असे त्यांचे घर असून त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. 26 तारखेला मिमादेवी यांचा मोठा मुलगा व पती बाहेर गेले होते. त्यामुळे त्या आणि लहान मुलगा नरेंद्र हे दोघेच घरात होते. गेल्या एक वर्षापासून मिमादेवी यांना आकडीचा त्रास होता. त्यादिवशी वरच्या घरातून खाली उतरत असताना त्यांना चक्कर आली. मग हीच संधी साधत नरेंद्रने आईला धक्का दिला. परिणामी त्या खाली पडल्याने त्यांच्या डोळय़ाला दुखापत झाली. त्यांना तत्काळ शीव मग तिकडून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान मुलानेच ढकलल्याचे मिमादेवी यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिमादेवी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नेहरूनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नरेंद्र याला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या