सोनाली खरेचं बर्फात शीर्षासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट आणि मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली खरे आपल्या फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. ती सध्या मनालीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सहलीला गेली आहे. तिथे सोनालीने चक्क बर्फात शीर्षासन केलं आहे. हा व्हिडीओ तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

‘जिथे तुमचा कम्फर्ट झोन संपतो, तिथूनच तुमच्या आयुष्याला सुरुवात होते…’ अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिलीय. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यापूर्वी देखील सोनालीने अनेकदा योग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिचा पती, अभिनेता बिजय आनंद हा योग प्रशिक्षक आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर आगामी काळात सोनाली ऍमेझॉन प्राईमच्या ‘वेल डन’ या मराठी वेबसीरिजमध्ये ती दिसणार आहे.