रियाल माद्रिदचा बार्सिलोनावर विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रियाल माद्रिदने बार्सिलोना क्लबचा 2-1 गोल फरकाने पराभव करुन ला लीगा या स्पॅनिश फुटबॉल लीग स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. पावसात झालेल्या या लढतीतील विजयामुळे रियाल माद्रिद व अॅटलेटीको माद्रिद या दोन संघांचे समान 66 गुण झाले.

मात्र सरस हेड टू हेड कामगिरीच्या जोरावर रियाल माद्रिदने अव्वल स्थान पटकावले. मात्र अॅटलेटीको माद्रिद क्लबला पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी असेल. दुबळ्या रियाल बेटीस क्लबविरुद्ध अॅटलेटीको माद्रिदचे पारडे जड मानले जात आहे. आजच्या लढतीत रियाल माद्रिदकडून करीम बेंजेमा व टोनी क्रुज यांनी गोल केले, तर बार्सिलोना क्लबकडून आस्कर मिनगुएजाने एकमेव गोल केला.