‘स्पोर्टिका श्री’सुद्धा सागर कातुर्डेने जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने वाई येथे झालेल्या स्पोर्टिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेवरही मुंबईकर सागर कातुर्डेने आपले वर्चस्व प्रस्थापित करत गेल्या महिनाभरात सलग आठवी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

सागर कातुर्डेसाठी यंदाचे वर्ष नॉनस्टॉप यशाचे ठरले आहे. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या दमदार आमदार श्रीपासून सुरू झालेला त्याचा जेतेपदाचा सिलसिला नागपूरच्या खासदार चषक, चेंबूर श्री, पोयसर जिमखाना श्री, अंधेरी श्री, सातारची बाळराजे श्री, कुर्ल्याची आमदार श्री आणि वाईची स्पोर्टिका श्रीपर्यंत नॉनस्टॉप आहे. विजेत्यांवर पुरस्कारांचा वर्षाव करणाऱया या स्पर्धेत सागरने हरमीत सिंग, उमेश गुप्ता, उदय देवरे यांच्यावर मात करत बाजी मारली. मुंबई उपनगरचा हरमीत सिंग उपविजेता ठरला. तसेच मेन्स फिजीक प्रकारात मन्सुरी शहा आणि काwतुक हडकर यांनी अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शरीरसौष्ठव संघटनेचे संजय मोरे, अजय खानविलकर, राजेश सावंत, विजय झगडे, मदन कडू, आयोजक संतोष शिंदे, संजय मालुसरे, संजय चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.

स्पोर्टिका श्री स्पर्धेचा निकाल
55 किलो ः 1. दीपक कांबळे (पुणे), 2. गितेश मोरे (रायगड), 3. अक्षय गवाणे (मुंबई उपनगर), ; 60किलो ः 1. हर्षल काटे (पुणे), 2. गणेश पाटील (रायगड), 3. अरुण दास (इंडियन नेव्ही), 65 किलो ः 1. निलेश घोंडे ( पुणे ), 2. नरेंद्र वाल्हेकर (पुणे), 3. संकेत भरम ( मुंबई ), 70 किलो ः 1. उमेश गुप्ता ( मुंबई ), 2. उमेश पांचाळ ( मुंबई उपनगर), 3. विलास घडवले ( मुंबई ), ; 75 किलो ः 1. उदय देवरे (रायगड), 2. संतोष भरणकर (मुंबई उपनगर), 3. गणेश दुसारीया (संभाजीनगर ), 80 किलो ः 1. ओमकार पाडळकर (कोल्हापूर), 2. आकाश खोत ( मुंबई उपनगर), 3. संदेश नलावडे (पुणे), 85 किलो ः 1. सागर कातुर्डे (मुंबई), 2. प्रणव खातू (मुंबई), 3. मिथुन ठाकूर ( पुणे), 85 किलोवरील ः 1. हरमित सिंग (मुंबई उपनगर), 2. उबेद पटेल (मुंबई उपनगर), 3. अभिषेक लोंढे (मुंबई), 4. प्रणव सुदेवाड (नांदेड), 5. सोहम चाकणकर (पुणे). किताब विजेता – सागर कातुर्डे (मुंबई ) उपविजेता – हरमित सिंग (मुंबई उपनगर)