मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांकडून अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इंदूर

मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका वसतिगृहात काही विद्यार्थ्यांनी अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका शाळेच्या आवारात एक मुलांचे वसतिगृह आहे. दहावीच्या दोन विद्यार्थी सातवीत शिकणार्‍या अकरा वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचे विद्यार्थी अल्पवयीन मुलाला नाचायला सांगायचे आणि मसाज करायलाही सांगायचे.

आरोपी विद्यार्थ्यांविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.